Tourism: Tripura plans six eco parks across districts to boost tourism, local livelihoods
- wix2266@gmail.com
- May 29
- 2 min read
Updated: Aug 6

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरचं पर्यटन पूर्णत: थंडावलं?
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरचं (Pahalgam Attack) पर्यटन थंडावल्याचं पाहायला मिळतंय. याबाबत महाराष्ट्र टूरिझम संघटनेचे अध्यक्ष अभिजीत पाटील म्हणतात, 22 एप्रिलची घटना घडली, ती दुःखद घटना आहे. पहिल्यांदा पर्यटकांवर अशाप्रकारचा अमानुष हल्ला झाला. त्यामुळे काश्मीरचे पर्यटन थंडावले, हे साहजिकच आहे. पण हे लवकरच वेळेने सुरू होईल. एक महिन्यापूर्वी 130 ऑक्यूपेंसी जात होती, ती आता 1 आणि 2 टक्क्यांवर आली आहे. काश्मीरने गेल्या तीन दशकात एक पाऊल पुढे,त्यानंतर आता 2 पाऊल पाठी पाहिले आहे.
''काश्मीरमध्ये लोकांना पुन्हा आणणे हे एक मोठे आव्हान''
अभिजीत पाटील म्हणतात, पहलगाममध्ये झालेला हा दहशतवादी हल्ला वेगळा होता, ज्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला आणि लोक पाकिस्तानच्या विरोधात रस्त्यावर आले. साधारण 2 दशकापूर्वी बंदूकीला सामोरे जाऊन लोक थकले होते. पण यंदा लोक घाबरले नाही, सरळ रस्त्यावर उतरले. या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये लोकांना पुन्हा आणणे हे एक मोठे आव्हान आहे. त्यात काही तरी करावे म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हंटले की आम्ही 12-13 लोक एकत्र येऊन पर्यटन सुरू करता येईल, जसे एअर लाइन सुरू झाले, तसे थेट 60 लोक एकत्र आले, काश्मीरचे थंडावलेले पर्यटन सुरळीत करण्यासाठी वेळ लागेल, पण पुन्हा सुरू होईल.
पहलगामच्या नागरिकांनी दाखवलेल्या धाडसाचेही कौतुक
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये एक भयानक दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये 26 नागरिकांचा मृत्यू झाला आणि यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेबद्दल नवीन भीती निर्माण झाली होती, मात्र या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील लोकांनी, विशेषतः पहलगामच्या नागरिकांनी दाखवलेल्या धाडसाचेही अनेकांकडून कौतुक करण्यात आले. या दरम्यान विविध अभिनेते आणि नेत्यांनी या ठिकाणी भेट दिली होती. अनेकांचे हे पाऊल काश्मीरमधील निसर्गरम्य पण संवेदनशील पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या पहलगाममध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी होते.
Comentários