top of page
This website was created by

Numerology: Virgo Horoscope Today for August 6, 2025: Positive results in your career front

Updated: Aug 6


Numerology: सोन्याचं आकर्षण तसं प्रत्येकालाच असतं. प्रत्येकजण आपल्या कुवतीप्रमाणे सोन्याचे दागिने घेण्याचा प्रयत्न करतो. बहुतेकदा ज्याच्या अंगावर जितके जास्त सोने परिधान केलेले असेल, तो व्यक्ती सर्वात श्रीमंत समजला जातो. सोनं परिधान करणं हे पुरुषांच्या तुलनेत महिलांना याचं जास्त आकर्षण असतं. अंकशास्त्रानुसार, प्रत्येक अंक कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतो. म्हणूनच, काही जन्मतारखेच्या लोकांसाठी सोने घालणे अजिबात शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की, जर हे लोक सोने परिधान करतील ते तर ते नुकसानाला सामोरे जातील. अशा कोणत्या जन्मतारखा आहेत? ज्यांनी सोने घालू नये...
Numerology: सोन्याचं आकर्षण तसं प्रत्येकालाच असतं. प्रत्येकजण आपल्या कुवतीप्रमाणे सोन्याचे दागिने घेण्याचा प्रयत्न करतो. बहुतेकदा ज्याच्या अंगावर जितके जास्त सोने परिधान केलेले असेल, तो व्यक्ती सर्वात श्रीमंत समजला जातो. सोनं परिधान करणं हे पुरुषांच्या तुलनेत महिलांना याचं जास्त आकर्षण असतं. अंकशास्त्रानुसार, प्रत्येक अंक कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतो. म्हणूनच, काही जन्मतारखेच्या लोकांसाठी सोने घालणे अजिबात शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की, जर हे लोक सोने परिधान करतील ते तर ते नुकसानाला सामोरे जातील. अशा कोणत्या जन्मतारखा आहेत? ज्यांनी सोने घालू नये...

सोने हे कोणत्या लोकांसाठी अशुभ?

ज्योतिषशास्त्रात, सोने हे गुरु ग्रहाशी संबंधित मानले जाते, जे पैसे, शहाणपण आणि आनंदाचे प्रतीक आहे. त्याच वेळी, काही जन्मतारखेच्या लोकांनी ते घालू नये. कारण अंकशास्त्रानुसार, प्रत्येक संख्येचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी विशेष संबंध असतो. ज्या महिन्याला तुम्ही जन्माला आला आहात, ती तारीख तुमची मूलांक असते.


मूलांक कसा ओळखाल?

जर तुमची जन्मतारीख दोन अंकांची असेल तर त्या अंकांची बेरीज तुमची मूलांक असेल उदाहरणार्थ, महिन्याच्या 1 ते 9 तारखेच्या दरम्यान जन्मलेल्या लोकांचा मूलांक समान असेल. दुसरीकडे, ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या 10 ते 31 तारखेदरम्यान होतो, त्यांचा मूलांक हा त्या तारखेच्या अंकांची बेरीज असतो. उदाहरणार्थ, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूलांक (2+3=5) (5) असेल. जर अंकांची बेरीज देखील दोन अंकांमध्ये असेल, उदाहरणार्थ, 29 तारखेला जन्मलेले लोक, (2+9=11) (1+1=2), तर अशा व्यक्तीचा मूलांक (2) असेल.

गुरूशी चांगले संबंध नाहीत

ज्योतिषशास्त्रानुसार, सोने हे गुरुचे प्रतीक आहे, म्हणून ज्या ग्रहाचा गुरुशी चांगला समन्वय नाही, त्या ग्रहाच्या संख्येच्या लोकांनी सोने घालणे टाळावे. जर असे लोक सोने घालतात तर मानसिक ताण, पैशाचे नुकसान, आरोग्य समस्या किंवा नातेसंबंधांमध्ये समस्या येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार, जाणून घेऊया कोणत्या तारखेला जन्मलेल्या लोकांनी सोने घालू नये? यासाठी कोणते उपाय करावेत?

या जन्मतारखेच्या लोकांनी सोनं अजिबात घालू नये?

मूलांक 2 - अंकशास्त्रानुसार, मूलांक 2 चा स्वामी चंद्र आहे. चंद्र आणि गुरु यांच्यातील संबंध मध्यवर्ती आहे, परंतु जर कुंडलीत चंद्र कमकुवत असेल किंवा शनि, राहू सारख्या ग्रहांचा प्रभाव असेल तर सोने परिधान केल्याने नुकसान होऊ शकते. या तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी सोने परिधान केल्याने अस्वस्थता, नातेसंबंधांमध्ये गैरसमज किंवा मानसिक ताण वाढू शकतो. गॅस किंवा अपचन सारख्या पोटाच्या समस्या देखील उद्भवू शकतात. उपाय - सकाळी भगवान शिव यांना दूध आणि पाणी अर्पण करा. चांदीची अंगठी किंवा साखळी घाला, त्यामुळे चंद्राला शक्ती मिळते.

मूलांक 6 - मूलांक 6 चा स्वामी शुक्र आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र आणि गुरु यांच्यातील संबंध चांगले मानले जात नाहीत. जर कुंडलीत शुक्र कमकुवत असेल किंवा गुरुशी वाईट संयोग होत असेल तर सोने परिधान केल्याने नोकरी किंवा व्यवसायात समस्या, नातेसंबंधांमध्ये तणाव किंवा पैशाचे नुकसान होऊ शकते. या तारखेला जन्मलेल्यांनी सोने धारण केल्याने त्वचेच्या समस्या किंवा थकवा येऊ शकतो. उपाय- देवी लक्ष्मीची पूजा करा आणि 'ओम श्रीं महालक्ष्म्यै नम:' चा 11 वेळा जप करा. चांदी किंवा हिऱ्याचे छोटे दागिने घाला.

मूलांक 8 - क्रमांक 8 हा शनिदेवाचा स्वामी आहे, जो गुरूचा शत्रू मानला जातो. या तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी सोने धारण केल्याने कामात अडथळे येऊ शकतात, हाडे किंवा सांधे दुखू शकतात किंवा पैशाची कमतरता निर्माण होऊ शकते. जर कुंडलीत शनि कमकुवत असेल किंवा गुरूसोबत वाईट स्थितीत असेल तर सोने धारण केल्याने मानसिक ताण वाढू शकतो. उपाय- शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा आणि 'ओम शं शनैश्चराय नम:' चा 11 वेळा जप करा. काळे तीळ किंवा तेल दान करा.

हेही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


Comentarios


RNI Logo.avif
NN Web.jpg

NATIONALISM NEWS : A feeling of love or pride for your own country; a feeling that your country is better than any other. Nationalism News is always ready to serve the nation. All of you also join Nationalism News and take a pledge to make India corruption and crime free.

Nationalism News is registered by the Office of the Registrar of Newspapers of India, Ministry of Information and Broadcasting, Government of India. - MAHBIL/2022/84726 (RNI)

The Website is designed by Expertiga

  • Facebook
  • LinkedIn
  • Instagram
  • Pinterest
  • Telegram
  • X
  • Youtube
  • Whatsapp
bottom of page