Laxman Hake : ज्या दिवशी जरांगे मुंबईत उपोषणाला बसेल, त्या दिवशी नांदेड ते मुंबई लाँग मार्च काढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा
- wix2266@gmail.com
- May 29
- 1 min read
Laxman Hake : ज्यांनी तुम्हाला आमदार खासदारांनी मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचविले अशा ओबीसी समाजाचे चोपडे जर उद्ध्वस्त करायला निघाल तर तुमची जागा दाखवून द्यायची ताकद ओबीसीमध्ये असल्याचा इशारा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलन मनोज जरांगे यांना दिला. नांदेड ते मुंबई पायी लॉन्ग मार्चच्या तयारीसाठी सध्या हाके हे राज्यभर दौरे करत आहेत. नुकतीच परभणी जिल्ह्यातील ओबीसी समाजाने लक्ष्मण हाके यांना दिलेल्या आलिशान गाडीतून त्यांचे दौरे होत असून गावोगावी फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जोरदार स्वागत केले जात आहे. आज सांगोला तालुक्यात हाके आले असता त्यांचे गावोगावी जंगी स्वागत केले जात होते.
मनोज जरांगे नावाचा माणूस मुंबईत उपोषणाला बसेल त्याच दिवशी..
ज्या दिवशी मनोज जरांगे नावाचा माणूस मुंबईत उपोषणाला बसेल त्याच दिवशी नांदेड जिल्ह्यातील माळेवाडी येथे नारळ फोडून आमच्या नांदेड ते मुंबई या लॉंग मार्चला सुरुवात होणार असल्याची घोषणा आज लक्ष्मण हाके यांनी केली. आज सांगोला तालुक्यातील जुनोनी गौडवाडी या गावात त्यांचा दौरा सुरू होता.
बोगस कुणबी दाखले घेतलेल्या ओबीसींना खड्यासारखे बाजूला करा
पंचायत राज निवडणुकीतही समाजाने फक्त खाऱ्या ओबीसीला मतदान करून बोगस कुणबी दाखले घेतलेल्या ओबीसींना खड्यासारखे बाजूला करा ही टॅगलाईन आमची असल्याचे हाके यांनी सांगितले. यासाठी राज्यभर 100 सभांचे आयोजन करण्यात आले असून अतिशय मायक्रो प्लॅनिंग करत सर्व ओबीसी एकत्र करण्याचे काम निवडणुकीपूर्वी करत असल्याचा दावा त्यांनी केला. जे जे ओबीसीचे झोपडे उद्ध्वस्त करू पाहत आहेत त्या सर्वांना हा इशारा असल्याचे त्यांनी सागितले. मुख्यमंत्री, मनोज जरांगे आणि ज्यांनी भुजबळ यांच्या मंत्रीपदाला विरोध केला त्या सर्वांना यावेळी ओबीसीची ताकद दाखवून देणार असल्याचे हाके यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Comments